
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शुजचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी एकमुखी निर्णय घेत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शूज देण्याचा ठराव पारित केला. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक बिरारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय गणवेश व शुजचे वाटप करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य गजानन पारधी, विनिता पाटील, भाऊसाहेब पाटील सह मुख्याध्यापिका सरला बाविस्कर, शिक्षक कमलेश मोरे, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, शिक्षिका विजया पाटील व विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता.