अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बुद्रुक येथील ग्राम विकास मंडळ संचलित कै सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस डी सूर्यवंशी सर होते.यावेळी अध्यक्ष व विज्ञान शिक्षक यांच्या हस्ते वैज्ञानिक डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोग दाखवून विज्ञानाचे धडे दिले तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगतातून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले विज्ञान शिक्षक जे. एस.पाटील सर यांनी मानवी जीवन व विज्ञान हे अविभाज्य घटक झालेले आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले. अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाचा शेवट होऊन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाय. एम. जाधव यांनी तर समारोप यू बी पाटील सर यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.