सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील पातोंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2021 ते 2026 पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून अपक्ष उमेदवारांसह बहुजन विरुद्ध परिवर्तन पॅनलची रंगत रंगली असून दोन्हीकडील पॅनेलने प्रचारात रंगत आणली असून अपक्ष उमेदवाराची प्रचारफेरीही सुरू झालेली आहे.
निवडणूकीच्या अंतिम माघारीच्या दिवशी अर्ज दाखल केलेल्या एकूण 46 उमेदवारांपैकी माघारींच्या शेवटच्या दिवशी 18 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 जागांसाठी आता एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सर्वसाधारण जागेमधून लोटन पाटील, प्रभाकर पाटील, जयप्रकाश पवार, संजय पवार, प्रशांत पवार, दिवाकर पवार, रमेश बिरारी, युवराज बाविस्कर, प्रभाकर बाविस्कर, पंडित लाड, महिला राखीव मधून विमलबाई बोरसे, सुनंदा पाटील, सुरेखा पाटील, ओबीसी राखीव मधून लोटन पाटील,रमेश बिरारी, अनु.जाती जमाती मधून पद्माकर वाघ, भटक्या जमाती मधून हिम्मत बेलदार आदी उमेदवारांनी माघार घेतली असून सर्वसाधारण 8 जागेसाठी आता मधुकर चौधरी, किशोर मोरे, जगतराव बोरसे,अनिल बागुल,कैलास पाटील, योगेश चौधरी, संभाजी बिरारी, सुभाष लाड,नेहरू पवार, अरुण पवार,सुनील पवार,राहुल पवार,खासेराव पवार, सुनील चौधरी,विठ्ठल बोरसे,हिरामण महाजन,महिला राखीवच्या 2 जागेसाठी मंदाबाई शिंदे,रत्नाबाई पाटील, रिता बाविस्कर, प्रतिभा पाटील,ओबीसीच्या 1 जागेसाठी भरत बिरारी, सुनील पवार,अनु. जाती जमातीच्या 1 जागेसाठी चुडामन संदानशिव,जगन्नाथ संदानशिव,जगन्नाथ सोनवणे तर भटक्या जमातीच्या 1 जागेसाठी राहुल लांबोळे,एकनाथ लोहार व वना मोरे आदीं उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अखेर 13 जागेवर 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.बहुजन व परिवर्तन असे दोन पॅनल तयार झालेले असून दोन्हीकडील पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला असून दोन्ही पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यासोबतच अपक्ष उमेदवारांनी देखील प्रचार सुरू केलेला आहे. मुख्य लढत ओबीसी प्रवर्गात दिसुन येत असून आजी माजी सरपंचात लढत जुंपली आहे.आणि ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. म्हणूनच या लढतीकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष असून शेवटी मतदानाच्या दिवशी शेतकरी मतदाराचा कौल कोणत्या पॅनल मध्ये आपले बहुमत टाकून सहकारी संस्थेचा कार्यभार बहुजन पॅनलच्या की परिवर्तन पॅनलच्या हाती देतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.