अमळनेर:- तालुक्यातील निम येथे किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड व फायटर ने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी सुमनबाई दत्तात्रय आगळे रा. निम यांच्या फिर्यादीनुसार गल्लीत राहत असलेल्या उत्तराबाई दगडु आगळे हिच्याशी मागील काही दिवसापूर्वी मुलाचे उधारीचे पैसे मागण्यावरुन किरकोळ वाद झाला होता. तेव्हा उत्तराबाई ही माझा दिर ईश्वर किसन आगळे हा सुटीवर आला की तुला पाहते असे बोलली होती. दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी 06.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी व तिचे पती दत्तात्रय आगळे, मुलगा ईश्वर, सुन मयुरी व मोठी सुन सोनी व नात आकांशा असे घरातच गप्पा मारत बसले होतो. तेव्हा अचानक ईश्वर किसन आगळे, दगडु किसन आगळे दोन्ही रा. निम तसेच नारायण संजय शिरसाठ व आकाश संजय शिरसाठ दोन्ही रा. तांदळी असे चारहीजण घराच्या अंगणात येवून मोठमोठ्याने शिवीगाळ करीत असतांना मुलगा ईश्वर दत्तात्रेय आगळे हा त्यांना विचारण्यास गेला की तुम्ही शिवीगाळ का करता आहेत त्यावर त्यांनी घरात घुसून ईश्वर किसन आगळे याने फिर्यादीची साडी धरुन वाईट उद्देशाने त्याच्या अंगावर ओढुन शिवीगाळ करत अंगणात ओढुन तु जास्त माती जायेल शे असे म्हणुन मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादीचे गळ्यातील मंगळसुत्र ओढाताणीत तुटुन खाली पडले. लोखंडी दांड्याने डाव्या खांद्यावर व दोन्ही पायांवर मारहाण केली . तसेच आकाश संजय शिरसाठ याने त्याच्या हातातील फायटरने ईश्वर दत्तात्रेय आगळे यास तोंडावर, मानेवर, छातीवर, पाठीवर मारहाण केली व नारायण संजय शिरसाठ याने चापटा बुक्याने मारहाण केली. तसेच दत्तात्रेय आगळे हे भांडण सोडवित असतांना दगडु किसन आगळे याने त्यांना त्याच्या हातातील काठीने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. त्यावेळी गावातील विक्की भिल, सुकलाल खैरनार, सुनिल आगळे अशांनी भांडणाची सोडवासोडव केली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे जावून उपचार घेवून उपचाराचे प्रमाण पत्र घेवून मारवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून भादवि कलम ४५२, ३५४, ३२४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली हे करीत आहेत.