
मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे…
अमळनेर:- तालुक्यात काल १५ कोरोना बाधीत आढळले असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे दिसत आहे.
तांबेपुरा २, आर के नगर ३, मुंदडा नगर ३, समर्थ नगर २, शिरुड नाका २, केशव नगर १, भालेराव नगर १, ढेकू रोड १, पिंपळी येथील १ व हाय रिस्क कॉन्टॅक्ट ३ असे एकूण १९ रुग्ण आहेत. त्यामुळे तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.